त्र्यंबकेश्वर : हरसुल परिसरात कोरोनामुळे घरातच भीमजयंती साजरी
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : हरसुल परिसरात कोरोनामुळे घरातच भीमजयंती साजरी

Gokul Pawar

हरसूल : देशात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातल्याने केलेल्या लॉकडाऊनमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी.जयंती शासनाच्या नियमांचे पालन करीत हरसूल परिसरात काही ठिकाणी घरातच साजरी करण्यात आली.

हरसूल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील राहत्या घरी ग्रामपंचायत सदस्य राहुल शार्दूल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती शासनाच्या नियमांचे पालन करीत उत्साह पूर्ण वातावरणात साजरी केली.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रा.प.सदस्य राहुल शार्दूल, संदीप शार्दूल यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुटुंबीय उपस्थित होते.

हरसूल : येथील भारत गॅस एजन्सी परिसरातील राहत्या घरी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती घरीच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात आली.

यावेळी पोपट महाले यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे घरातच भिमजयंती साजरी करण्यात आली.
सुनिल काशीद , किरण काशीद, राहुल काशीद आदी तरूणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत घरातच भीम जयंती साजरी करण्याचे आव्हान केले.
तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरातच भीमजयंती साजरी करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com