वाहनधारकांनो सावधान! शहरात सिग्नलवर अवतरणार यम
स्थानिक बातम्या

वाहनधारकांनो सावधान! शहरात सिग्नलवर अवतरणार यम

Gokul Pawar

नाशिक । चालकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी शहरातील 14 सिग्नलवर आता ‘यमराज’ अवतरणार आहेत. 1 मार्चपासून हा उपक्रम सुरु होणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन आज (दि.29) पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात झाले. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकाकडून दंड वसूल करत आहेत. तरीदेखील वाहनचालक सर्रासपणे नियम पायदळी तुडवतात. त्यामुळे अशा वाहनचालकांना नियम पाळण्याचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आता ’यमराज’ अवतरणार असून 12 स्वयंसेवकांची मदत घेणार आहे. वाहतूक जनजागृतीचे थेट रेड एफ. एम. 93.5 वर प्रक्षेपण केले जाणार आहे.

शहर वाहतूक शाखा व एस.डी.एफ.सी. बँक आणि रेड फेम यांच्या संयुक्त विद्यमाने एक मार्च ते सात मार्च या कालावधित रस्ता सुरक्षा अनुषंगाने शहरातील 14 सिग्नलवर वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यामुळे वाहन चालकांनी सिग्नल न तोडणे, हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, झेब्रा क्रॉसिंग, वाहनाचा वेग यासह रस्ता सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत असे आवाहन यावेळी नांगरे पाटील यांनी केले.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, एसडीएफसी बँकेचे सर्कल हेड प्रेमजीत कोनवर, राहुल देशपांडे, सचिन भास्कर, अंतरा आगते आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com