एचपीटी महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज अवॉर्ड’
स्थानिक बातम्या

एचपीटी महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज अवॉर्ड’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज अवॉर्ड’ (सर्वोत्तम महाविद्यालय) जाहीर झाला. याबद्दल महाविद्यालयात सोमवारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थी विकास मंडळाने स्मार्ट कट्ट्यावर आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सर्वंकष गुणवत्तेला उजाळा दिला.

महाविद्यालयाला सर्वोत्तम पुरस्कार मिळाला असतानाच रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विवेक बोबडे यांना सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. यामुळे महाविद्यालयात एकाच दिवशी दुग्ध शर्करा योग जुळून आल्याने आनंद साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनादिनी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे सोमवारी दिसत वातावरण दिसत होते.

प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी या यशाचे श्रेय उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे, डॉ. मृणालिनी देशपांडे, नॅक समन्वयक डॉ. विवेक बोबडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दिले.

Deshdoot
www.deshdoot.com