त्र्यंबकेश्वर : उंबरने येथील महिलांची मार्चच्या सुरवातीलाच पाण्यासाठी दाहीदिशा
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : उंबरने येथील महिलांची मार्चच्या सुरवातीलाच पाण्यासाठी दाहीदिशा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : देशभरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक धुळवड व रंगपंचमी साजरी करीत आहेत. अशातच त्र्यंबक तालुक्यातील उंबरने येथील महिला एक हंडा पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे एकीकडे महिला धुळवडीचा आनंद घेत आहेत तर दुसरीकडे या महिला पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

दरम्यान नुकताच महिला दिन राज्यात साजरा करण्यात आला. पण अजूनही ग्रामीण भागातील महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासू लागली आहे. त्र्यंबक तालुक्यातील उंबरने या गावची ही कथा. त्र्यंबक तालुक्याताटापासूनच अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लवकरच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गावातील महिलांना कसरत पाणी आणावे लागते. येथील विहीर कोरडी पडल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागत आहे.

परवा जगभर मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा होत असताना उंबरने गावच्या महिला मात्र दोन किलोमीटरवरील विहिरीवरून पाणी आणत होत्या. वयोवृद्ध महिलांना काट्याकुट्यातून वाट काढत डोंगराच्या चढणीवरून डोक्यावर दोन हंडे घेऊन पाणी वाहत होत्या. उंबरने गाव उंचवट्यावर असल्याने दिंड दोन किलोमीटर खाली दरीत जाऊन पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.

दरम्यान सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून या गावाचा पाणी प्रश्न सोडवणायसाठी प्रयत्न सुरु आहेत. ग्रामस्थांना हाताशी घेत सोशल फोरमने टँकर मुक्तीच्या दिशेने मोट बांधली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com