अंबड : टोळक्यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांना धक्काबुक्की
स्थानिक बातम्या

अंबड : टोळक्यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांना धक्काबुक्की

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। दहशत निर्माण करण्यासाठी हाणामारी करणार्‍या टोळक्यास पकडण्यासाठी गेलेल्या अधिकारी तसेच पोलीस पथकास चौघांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा प्रकार अंबड लिंक रोडवरील संजीनगर भागात घडला.

अक्षय उत्तम जाधव (24 रा.वरचे चुंचाळ), शैलेश गोरखनाथ माळी (26 रा.वावरेनगर,सिडको),इंद्रजीत अशोक खुराणा (21 रा.त्रिमुर्ती चौक, नवीन नाशिक) व शुभम साहेबराव अरगडे (25 रा.रामकृष्णनगर,अंबड) अशी संशयीतांची नावे आहेत.

संजीवनगर भागात गुरूवारी (दि. 5) सायंकाळी संशयीत हातात लाठ्या काठ्या घेवून आरडाओरड करीत दहशत निर्माण करीत होते. यावेळी दिसेल त्यास संशयीत काठी व गजाने मारहाण करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार अंबडचे उपनिरीक्षक म्हात्रे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असता संशयीतांनी फौजदार म्हात्रे यांच्यासह पथकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com