नाशिक बाजार समिती सभापती निवड 11 मार्चला
स्थानिक बातम्या

नाशिक बाजार समिती सभापती निवड 11 मार्चला

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदावरून शिवाजी चुंभळे यांची गच्छंती झाल्यानंतर आता नवीन सभापती निवडण्यासाठी बुधवार (दि.11 ) मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. सभापतिपदासाठी प्रभारी सभापती युवराज कोठुळे यांच्यासह संचालक संपतराव सकाळे यांची नावे चर्चेत आहेत.दरम्यान,बाजार समितीचे संचालक मंगळवारी(दि.3)सहलीवर रवाना झाले आहेत.

तत्कालीन सभापती चुंभळे यांच्यावर अविश्वास दाखल करत बाजार समितीच्या 15 संचालकांनी विरोधात मत नोंदवले होते.त्यामुळे चुंभळे यांचे सभापतीपद गेले.सभापतीपद रिक्त होताच प्रभारी सभापतीपदी युवराज कोठुळे यांची निवड करण्यात आली.ही निवड होताच बाजार समितीच्या निलंबित सेवकांना कामावर हजर करुन घेण्यात आले.त्यामुळे हे पद कायमच चर्चेत राहिले आहे.

एकाच पॅनलकडून निवडून आलेले चुंभळे व संपतराव सकाळे यांच्यामध्ये द्वंद्व झाल्यानंतर सभापतीपदाचा वाद चांगलाच चिघळला असून सहकार क्षेत्राबरोबरच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष नाशिक बाजार समितीकदे वेधले गेले आहे.यामुळे येत्या 11 तारखेला बोलाविण्यात अलेल्या विषेश बैठकीत काय घडामोडी घडतात,याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com