अखेर समृद्धी महामार्गास ‘हिंदु हृदयसम्राटांचे’ नाव
स्थानिक बातम्या

अखेर समृद्धी महामार्गास ‘हिंदु हृदयसम्राटांचे’ नाव

Gokul Pawar

नाशिक : नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे नामकरण यापुढे ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी प्रस्ताव झाल्यानंतर आता थेट शासन निर्णय झाला आहे. नागपूर-मुंबई हायवे मार्गाचे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या ऐवजी सादर महामार्गास यापुढे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामाधिकरण करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यापूर्वी या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपाचा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अखेर या निर्णयावर काळ रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com