आयुर्वेदिक काढ्याने वाढू शकते राेगप्रतिकार शक्ती : वैद्य विभव येवलेकर
स्थानिक बातम्या

आयुर्वेदिक काढ्याने वाढू शकते राेगप्रतिकार शक्ती : वैद्य विभव येवलेकर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कराेनाचे संकट थाेपवून लावण्यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. देशाला संबाेधित करतांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कराेनापासून बचाव करण्यासाठी सप्तपदी सांगितली. प्रामुख्याने नागरिकांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी यात आयुर्वेदिक काढा वापरावा, त्यामाध्यमातून राेगप्रतिकारक शक्ती वाढू शकते असे सांगितले.

त्यानुसार केंद्रीय अायुष मंत्रालयाने एक परिपत्रक काढून काेणते काढे घ्यावेत व काय प्रतिबंधात्मक उपाय करता येतील, हे जाहिर केले. मात्र, हे काढे घेताना वैद्याचा सल्ला आवश्यक असल्याचे वैद्य विभव येवलेकर यांनी सांगितले आहे.

संपूर्ण जग कराेनाशी दाेन हात करत आहे. त्यावर अद्याप आैषध उपलब्ध झाले नसून आयुष मंत्रालय दाेन स्तरावर उपाययाेजना राबवित आहे. यात प्रतिबंधात्मक व चिकित्सात्मक पद्धतींचा वापर सध्या सुरू असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशाला संबाेधित करतांना आयुर्वेदिक उपचार घ्यावे, असे आवाहन जनतेला केले. मात्र विशेषत: काेणता काढा घ्यावा असे नमूद केले नाही. त्यामुळे जाे रूग्ण आहे, त्याच्या लक्षणांनुसार वैद्य वेगवेगळे काढे देऊ शकतात.

नागरिकांनी परस्पर काेणताही उपचार वा काढा घेऊ नये असे वैद्यांचे म्हणणे आहे. आयुर्वेदिक काढे राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करू शकतात, असे वैद्य विभव येवलेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, आयुष मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक व चिकित्सात्मक या दाेन पद्धतीचा अवलंब करून कराेनाला हरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पहिल्या पद्धतीचा वापर सुरू असून चिकित्सात्मक पद्धतीत आयुर्वैदिक उपचार कराेना पाॅझिटिव्ह असलेल्या रूग्णाला दिले जाऊ शकतात, मात्र त्यासाठी याेग्य पद्धत व वैद्यकिय सल्ला गरजेचा आहे, असे वैद्य विभव येवलेकर यांचे मत आहे.

खालील काढा हा वैद्य विभव येवलेकर यांनी सुचविला आहे. तरी नागरिकांनी आपल्या वैद्य किंवा डाॅक्टरांना विचारूनच त्याचे सेवन करावे.

सुंठ 1/2 चमचा, तुळशीची 4 पाने, गुळवेल 1/2 चमचा, वेलदोडे 2
आधिक 4 कप पाणी आटवून 1 कप करणे – गाळून घेणे. सकाळी पिणे.
२) सितोपलादी चूर्ण व महासुदर्शन चूर्ण मधासोबत नियमित घेणे.

Deshdoot
www.deshdoot.com