PhotoGallary : रेझिंग डे निमित्ताने पथनाट्यातून वाहतुक नियमांचा जागर
स्थानिक बातम्या

PhotoGallary : रेझिंग डे निमित्ताने पथनाट्यातून वाहतुक नियमांचा जागर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे दर वर्षी हजारो नागरिकांना जीव गमवावा लागतो. याबाबत नागरिक व वाहनधारकांमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी रेझिंग डेच्या निमित्ताने पंचवटी पोलिसांकडून एनबीटी लॉ महाविद्यालयाच्या मदतीने पथनाट्यातून वाहतुकीविषयी जनजागृती करण्यात आली.

दरम्यान नाशिक पोलिसांच्या वतीने २ ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे साजरा होत आहे. या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी एनबीटी लॉ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रामकुंड, पंचवटी कारंजा परिसरात पथनाट्ये सादर करून लोकांना प्रबोधन केले.

यामध्ये शहरातील वाढती वाहने आणि अरूंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ट्रॅफिक सिग्नल तोडणे, वन वे मध्ये वाहन चालवणे, गर्दीच्या ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणे, सायलंट झोनमध्ये हॉर्न वाजवणे, नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे असे प्रकार या पथनाट्यातून दाखविण्यात आले. तसेच वाहतुकीचे नियम, चिन्हांचे अर्थ, वाहनधारकांची कर्त्यव्ये यासह अपघातांचा धोका, अपघातांचे परिणाम याचे सादरीकरण पथनाट्यांमधून करण्यात आले. वाहतूक नियमांकडे न पाळल्याने अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यावर उपाय म्हणून पंचवटी पोलिसांनी नागरिकांचे व वाहनधारकांचे प्रबोधन करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन केले होते.

सध्या शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वाहनधारकांध्ये जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्याच्या आयोजन केले आहे. तसेच अनेकदा वाहनधारक ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॅसिंग नियम पाळत नाहीत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन रुग्णवाहिकेला रास्ता मिळत नाही. अशा अनेक वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.      -अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे

Deshdoot
www.deshdoot.com