इगतपुरी न्यायालयात स्वयंचलीत हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा; जिल्ह्यात पहीलाच प्रयोग
स्थानिक बातम्या

इगतपुरी न्यायालयात स्वयंचलीत हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा; जिल्ह्यात पहीलाच प्रयोग

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इगतपुरी न्यायालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचलीत हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा करण्यात आली असुन नाशिक जिल्ह्यात हा पहीलाच प्रयोग ठरला आहे.

इगतपुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश श्रीमती आर. एन. खान यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुका वकील संघातर्फे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयांमधील कामकाजात बदल करण्यात आले होते. येत्या १ जून पासून न्यायालयांमधील कामकाज काही प्रमाणात पुर्वव्रत होण्याची शक्यता आहे.

यासाठी न्यायालयात येणारे वकील, पक्षकार व नागरिकांनी प्रवेश व्दारावर हात धुवुनच आत प्रवेश करावा असे आवाहन इगतपुरी तालुका वकील संघाचे सचिव अँड. यशवंत कडु यांनी केले आहे. तसेच न्यायालयात प्रवेश करतांना प्रवेशव्दारावरचं प्रत्येक वकील, कर्मचारी व पक्षकार यांचे थर्मल क्रीनिंग करण्यात येणार आहे. तालुक्यात २५ मे रोजी दोन जन कोरोना बाधीत सापडल्यामुळे वकील व पक्षकारांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय महत्वपुर्ण ठरला आहे.

त्याचप्रमाणे स्वच्छतागृहातही स्वयंचलित सनिटायझर व हॅण्डवॉश बसवण्यात आले आहे. वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम, सचिव अँड. यशवंत कडु यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com