जेलरोड : चोरटयांनी एटीएम फोडले अन् अचानक सायरन वाजला …
स्थानिक बातम्या

जेलरोड : चोरटयांनी एटीएम फोडले अन् अचानक सायरन वाजला …

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड : जेलरोड येथील युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर नागरिकांत भीती पसरली आहे.

दरम्यान जेलरोड परिसरात सेंट फिलोमिना हायस्कूल समोर हे युनियन बँकेचे एटीएम आहे. यावेळी चोरटयांनी एटीएमच्या आजूबाजूच्या कॅमेऱ्यांवर स्प्रे मारले. त्यानंतर एटीएम फोडून बाहेर आणले. याचवेळी नाशिकरोड पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेल्यामुळे एटीएम सोडून चोरटयांनी पलायन केले. यामुळे मोठी चोरी टळली.

येथील एका कॅमेऱ्यात तिघे संशयित दिसून येत आहेत. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com