देवळाली कॅम्प : संसरीत युवकावर कोयत्याने हल्ला
स्थानिक बातम्या

देवळाली कॅम्प : संसरीत युवकावर कोयत्याने हल्ला

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : संसरी येथे बुधवारी (दि.२०) रात्री नऊ च्या सुमारास एका युवकावर कोयत्याने हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. दिनेश गोडसे असे जखमी युवकाचे नाव आहे.

दरम्यान या जखमी युवकास तात्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळातही देवळाली कॅम्प शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. आधी हडोळा परिसरात खुलेआम गोळीबारा नंतर कॅथे कॉलनी येथे युवकावर कोयत्याने हल्ला झाला.

त्यानंतर आज ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com