पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात होम कोरोन्टाईनचे आठ गुन्हे दाखल

पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात होम कोरोन्टाईनचे आठ गुन्हे दाखल

पिंपळगाव बसवंत : शहरात गेली सहा दिवसापासुन पोलीसांनी कडक वातावरण निर्माण केले असुन शहरातील किराणा.मेडीकल .भाजीपाला वगळता सर्वच बंद ठेवण्यात आले आहे.

शहरातील मध्य वस्तीतील भाजीपाला मार्केट ग्रामपंचायत व पोलीस ठाणे प्रशासनाने शहरातील पाच ठिकाणी विभागुन भाजीपाला मार्केट भरविले असुन शहरात विविध नगरात जवळपास १३० नागरीक विविध शहरातुन आले असुन त्यांच्या आरोग्य तपासणी करन्यात आले असुन या पैकी पंधरा नागरीकांना होम क्लोरोंटाईन चा सल्ला देण्यात आरोग्य विभागाने सांगितले होते.

त्यापैकी आठ व्यक्तीनी शासनाचे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन शहरात कलम १४४ लागू असताना देखील व जे कोणी नियमांचे पालन करनार नाही अशा व्यक्ती वर गुन्हा दाखल करन्याचा ईशारा पो.नि.संजय महाजन यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com