इगतपुरी : अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्याकडून तालुक्यात एक हात मदतीचा

इगतपुरी : अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्याकडून तालुक्यात एक हात मदतीचा

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे सगळीकडे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची दयनीय स्थिती आहे.

तालुक्यातील गरजू आदिवासी भागातील नागरिकांच्या मदतीसाठी मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी पुढाकार घेतला. त्यांचे मित्र बंटी पगारे व मित्र परिवार यांच्या हस्ते हा कायकर्म राबविण्यात आला.

गोरगरीब, गरजू, पात्र आदिवासी बांधवांना अन्न-धान्य, भाजीपाला, मुलांना पोषक बिस्किटे आदी वस्तुंच्या स्वरुपात मदतीचे वाटप केले जात आहे. आदिवासी दुर्गम वाड्या पाड्यांवर चिन्मय उदगीरकर यांच्यामार्फत मदत पोहोचवण्यात आली.

मदतकार्य करतांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून मदतीचे वाटप करण्यात आले. मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करणे आणि कोरोनाविषयक प्रबोधन करण्यात आले. आदिवासी बांधवांनी एक हात मदतीचा उपक्रमाबद्धल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांचे आभार मानले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com