विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडून ४१ लाख ३० हजारांची मदत

विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडून ४१ लाख ३० हजारांची मदत

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न होत असून, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या करोना नियंत्रणासाठी पेठ तालुक्यातील पेठ ग्रामीण रुग्णालय व सात-बारा केंद्र आणि दिंडोरी तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय व दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक विकासनिधीतून ४१ लाख ३० हजार रुपयांची मदत केली. या निधीतून करोना लढ्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री घेण्यात आली आहे.

या साहित्याचा वापर कोविड १९ सेंटर तसेच डेडिकेटेड कोविड-१९ सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी केला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून देण्यात आलेले आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर बाबींचे वितरण श्री. झिरवाळ यांनी केले.

यावेळी पेठ तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील व कोचरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खोकले यांनी हे साहित्य स्वीकारले. पेठ तहसीलदार संदीप भोसले, दिंडोरी तहसीलदार कैलास पवार, गोकुळ झिरवाळ तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पेठ तालुक्यासाठी देण्यात आलेले साहित्य

ऑक्सी मिटर ८, पीपीइ किट ५००, एन-९५ मास्क एक हजार, नेब्युलायझर ५, सॅनीटायझरच्या दोन हजार बॉटल, चादरी १८८, बेडशीट ११९ व फोम गाद्या ३० देण्यात आल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यासाठी देण्यात आलेले साहित्य

दिंडोरी तालुक्यासाठी १२ ऑक्सिमीटर, पीपीई किट ५००, एन- ९५ मास्क एक हजार, नेब्युलायझर ५, सॅनिटायझर दोन हजार बॉटल, चादरी २१६, बेडशीट १५३, फोम गाद्या ३६ देण्यात आल्या आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com