नवीन नाशिक : जांभळाच्या झाडावरून पडल्याने वृद्धेचा मृत्यू

नवीन नाशिक : जांभळाच्या झाडावरून पडल्याने वृद्धेचा मृत्यू

नवीन नाशिक : जांभूळ तोडण्याकरीता गेलेल्या एका वृद्धेचा तोल जाऊन इलेक्ट्रिकच्या डीपीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशर महादेव तांगडे ( ६२ वर्षे रा. शिवशक्ती चौक, सेवादास नगर स्वाध्याय केंद्राजवळ ) या जांभळाच्या झाडावर जांभूळ तोडण्याकरिता गेल्या असता त्यांचा तोल जाऊन त्या लगतच असलेल्या इलेक्ट्रिकच्या डीपीवर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्यांचे पती महादेव रामकृष्ण तांगडे यांनी तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सदर महिलेचा मृत्यू हा विजेचा शॉक लागुन झाला की झाडावरून पडून झाला याबाबत स्पष्टता नाही शवविच्छेदना नंतर याबाबत सविस्तर माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अविनाश चव्हाण करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com