हरसूल : जातेगाव येथील वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू

हरसूल : जातेगाव येथील वृद्धाचा  धरणात बुडून मृत्यू

वेळूंजे | वि. प्र : हरसूल जवळील जातेगाव (खु) येथील आनंदा तरवारे हे अंघोळीसाठी धरणावर गेले असता पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची काल (दि.२६) सायंकाळी घडली.

दरम्यान काल (दि.२६) अक्षय तृतीयेचा सण असल्याने सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास गौराई घेऊन धरणावर गेले होते. यावेळी गौराईचे विसर्जन करून नंतर अंघोळ करावी या हेतूने आनंदा तरवारे (६१) हे पाण्यात उतरले. दुर्दैवाने कठडा असल्या कारणाने त्यांचा पाय घासरून ते खोल पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात बुडाले.

धरण खोल असल्याने काल मृतदेह शोधण्यास अडचण आली. आज (दि. २७) रोजी हरसूल पोलिसांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने सकाळी १०.३० वा. त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार झिरवाळ व हरसूल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. विशाल टकले करीत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com