देवळाली कॅम्प : बिबट्याच्या हल्ल्यात दोनवडे येथील वृद्ध ठार
स्थानिक बातम्या

देवळाली कॅम्प : बिबट्याच्या हल्ल्यात दोनवडे येथील वृद्ध ठार

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील दोनवडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार झाल्याची घटना घडली आहे. जीवराम गोविंद ठुबे (७६) असे या या वृद्धाचे नाव आहे.

दरम्यान आज (दि. १५) पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात ते गतप्राण झाले.

गेल्या महिनाभरा पासून राहुरी, नानेगाव, शेवगे दारणा, पळसे, मोहगाव, देवळाली कॅम्प, भगूर, या दारणा काठच्या गावात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिक भयभीत झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com