Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकआंबेडकरी तरुण म्हणतात, ‘यंदाची भीम जयंती पुस्तके वाचून’ साजरी करणार

आंबेडकरी तरुण म्हणतात, ‘यंदाची भीम जयंती पुस्तके वाचून’ साजरी करणार

नाशिक : कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर देशात येत्या १४ एप्रिलपर्यंत डाऊन आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती घरातूनच साजरी करण्याचा निर्णय आंबेडकरी अनुयायांनी घेतला आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी नागरिक घरात थांबून आहेत. त्यामुळे यंदा होणारी भीम जयंती देखील घरी राहूनच व पुस्तके वाचून साजरी करणार असल्याचा संकल्प आंबेडकरी तरुणांनी केला आहे. तसेच सोशल मीडियावर ऑनलाइन भीम जयंतीचा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. या माध्यमातून निबंध, चित्रकला, वकृत्व स्पर्धा या स्पर्धा ऑनलाइन घेतल्या जात आहेत. तर पुस्तक वाचनाला सर्वाधिक प्रतिसाद तरुणांकडून मिळत आहे. यासाठीचे यासाठीची कॅम्पेन राज्यभरात राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

वाचाल तर वाचाल या संकल्पनेतून  मूळ नाशिकच्या चांदवड चा रहिवासी व सध्या पुण्यात राहणाऱ्या रोहन कापडणे या ग्राफिक डिझायनर ने तयार केलेले ग्राफिक डिझाइन सर्वत्र व्हायरल होत आहे. या द्वारे यंदाची भीम जयंती घरी पुस्तके वाचून करणार असा आशय घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे त्यामुळे यंदा प्रथमच ऑनलाइन भीम जयंती घराघरात साजरी होणार आहे.

लॉक डाऊन मुळे आम्ही मित्रांनी ‘यंदाची भीमजयंती घरात बसून, पुस्तक वाचून साजरी करूयात’ हा ट्रेंड चालवायचं ठरलं. मग त्या आशयाने ही डिझाईन बनवली. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. भीम अनुयायांनी बाबासाहेबांना पुस्तकात शोधावं हा उद्देश सफल होताना दिसतो आहे.
-रोहन कापडणे, ग्राफिक्स डिझाईनर चांदवड.

- Advertisment -

ताज्या बातम्या