Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिककरांनो! सावधान हवा बदलतेय; आरोग्याची काळजी घ्या

नाशिककरांनो! सावधान हवा बदलतेय; आरोग्याची काळजी घ्या

नाशिक : नाशिक शहर हे वर्षभर मिळणाऱ्या स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरणासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण मागील काही वर्षांपासून हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. खासकरून २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यापासुन नाशिकची हवा वेगाने प्रदूषित होण्यास सुरवात झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या Air Quality Monitoring Station च्या आकड्यांनुसार नाशिकचा एअर क्वालिटी इंडेक्स नोव्हेंबर मध्ये सलग १२ दिवस १५० पेक्षा जास्त होता.

दरम्यान वायूप्रदूषण म्हटलं कि मुख्यत्वे दिल्ली, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये होताना दिसत आहे. परंतु नाशिक हे नैसर्गिक संशाधणी बहरलेले आहे. त्यामुळे अनेकजण या शहराची निवड करतात राहण्यासाठी करतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या वातावरणात बदल होतांना दिसत आहे. शहराला मिळणारी खेळती हवा सध्या वायू प्रदूषणाला आमंत्रित करत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यत्वे सातपूर एमआयडीसी भागातील वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या भागात वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisement -

या परिसरातील संत कबीरनगर, अंबड लिंक रोड, शिरीन मेडोज ह्या परिसरांमधून हे प्रदूषण उघड्या डोळ्यांनी दिसत असून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. खासकरून वाढत्या थंडीसोबत रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणामुळे धुरक्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. यामुळे शहर वायू प्रदूषणाच्या विळख्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान नाशिकमधील झटका या संस्थेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये नाशिककरांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच काही उपाय या संस्थेच्या माध्यमातून सुचविण्यात आले आहेत.

MPCB ने सातपूर एमआयडीसीमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या औद्योगिक वायू उत्सर्जनाला आळा घालावा जेणेकरून तर धुरक्याचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असेही सांगण्यात येत आहे.

सातपूर एमआयडीसी भागातील स्टेशनची २९ ऑक्टोबर २०१९ नंतरची माहीती MPCB वेबसाईटवर उपलब्ध नाही. त्यामुळे सातपूर मध्ये होणाऱ्या प्रदूषणाची खरी पातळी समजू शकणे कठीण झाले आहे. आपल्या भागातील हवेच्या गुणवत्तेची पातळी समजणे हा तेथील रहिवाशांचा हक्क आहे. MPCB ने लवकरात लवकर ही माहीती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

एकूणच शहरातील नागरिकांना आरोग्य महत्वाचे असल्याने याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच वाढत्या औद्योगिकीरकणात लोकांच्या आरोग्याकडे आणि हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या