जिल्हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष : एरियल फोटोग्राफीद्वारे खुलणार जिल्ह्याचे वैभव
स्थानिक बातम्या

जिल्हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष : एरियल फोटोग्राफीद्वारे खुलणार जिल्ह्याचे वैभव

Gokul Pawar

नाशिक । जिल्हा निर्मितीच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ड्रोनद्वारे जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक व इतर महत्त्वपूर्ण स्थळांची एरियल फोटोग्राफी करून त्याचे कॉफी टेबल बुकमध्ये समावेश केला जाणार आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.28) जिल्हा नियोजन समितीची आढावा घेतला जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने रखडलेले प्रकल्प व नवीन प्रकल्प याची यादी तयार केली जाणार आहे. शुक्रवारी (दि.31) अर्थमंत्री अजित पवार हे जिल्हाचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे वरील योजनांसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली जाईल.

त्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला गंगापूर धरणावरील बोट क्लबचादेखील समावेश आहे. तसेच नाशिक मेडिकल हब झाले पाहिजे यासाठी भुजबळ प्रयत्नशील आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातदेखील भुजबळांनी नाशिक मेडिकल हब झाले पाहिजेे याचा पुनरुच्चार केला होता. त्याचा विशेष आराखडा तयार करून त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी केली जाणार आहे.

त्यातच जिल्हा निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी मे महिन्यात जिल्हाधिकार्‍यांच्या संकल्पनेतून जाणार आहेे. त्यात वैविध्यपूर्ण व जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी स्थळांचा फोटोचा समावेश असलेले कॉफी टेबल बुकमध्ये तयार केले जाणार आहे.

नाशिक फेस्टिव्हल रंगणार
आघाडी सरकारमध्ये भुजबळ पालकमंत्री असताना नाशिक फेस्टिव्हलची मेजवानी नागरिकांना मिळायची. राज्यात सत्तांतर झाल्यावर फेस्टिव्हलवर फुली मारण्यात आली होती. भुजबळ पालकमंत्री झाल्याने नाशिक फेस्टिव्हल पुन्हा रंगणार आहे.

जिल्हा निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण स्थळांची माहिती देणार्‍या स्थळांची ड्रोनद्वारे एरियल फोटोग्राफी केली जाईल. त्याचे कॉफी टेबल बुक तयार केले जाईल.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com