प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा : डॉ.दावल साळवे
स्थानिक बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा : डॉ.दावल साळवे

Gokul Pawar

नाशिक । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग पूर्णतः जिल्ह्यात सज्ज आहे.सर्दी,ताप,खोकल्याच्या औषधांचा साठाही जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी दिली.

जिल्ह्यात करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण एकही आढळलेला नसून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्याची पूर्णता काळजी घेतली जात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात 102 प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपकेंद्रही जिल्ह्यात आहेत.या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्दी,ताप,खोकला यावर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांसाठी लागणारा औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांना औषधांचा कुठलाही तुटवडा भासणार नाही,अशी काळजी आरोग्य विभागाने घेतली असल्याचेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com