पंचवटीत मद्य विक्री करणार्‍या हाँटेलवर छापा; १ लाख ८३ हजाराचा साठा जप्त
स्थानिक बातम्या

पंचवटीत मद्य विक्री करणार्‍या हाँटेलवर छापा; १ लाख ८३ हजाराचा साठा जप्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : लाँकडाऊन असताना गुपचूप मद्य विक्री करणार्‍या पंचवटितील एका हाँटेलवर छापा टाकून पंचवटी पोलिसांनी १ लाख ८३ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

सदरची कारवाई मालेगाव स्टँण्ड परिसरातील हाटेल न्यु पंजाब या हाँटेलवर करण्यात आली. याप्रकरणी न्यू पंजाब हॉटेलचा मालक संशयित आकाश संदीप शर्मा (24, रा. जाजूवाडी, इंद्रकुंड, पंचवटी), नोकर देवराज अशोकराव देवकाते (26, रा. साईनगर, अमरावती. हल्ली रा. न्यू पंजाब हॉटेल) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप चोपडे यांना, मालेगाव स्टॅण्ड परिसरातील हॉटेल न्यू पंजाब लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग या ठिकाणी संचारबंदी असतानाही बेकायदेशीररित्या मद्याची विक्री होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांनी छापा टाकला.

त्यावेळी हॉटेलमध्ये वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांचा सुमारे १ लाख ८३ हजार २७० रुपयांचा विदेशी मद्याच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच, ४६० रुपये रोख, दोन डिव्हीआर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच, यात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी, सहाय्यक निरीक्षक संदीप चोपडे, सहाय्यक उपनिरीक्षक सरोदे, देवरे, नवनाथ आहेर यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com