त्र्यंबकेश्वर : विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पोलिसांनी घडवली शहरभर पायपीट

त्र्यंबकेश्वर : विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पोलिसांनी घडवली शहरभर पायपीट

त्र्यंबकेश्वर : शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना त्र्यंबक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. या दुचाकीस्वारांना मोटरसायकल सह पायी शहरातील गल्लोगल्ली फिरवण्याची शिक्षा केली आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यामुळे जीवनावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. परंतु अशाही परिस्थितीत नागरिक बाहेर पडताना दिसतात. त्र्यंबकेश्वर शहरात कडेकोट बंदोबस्त असतानाही काही दुचाकी धारक शहरातून फिरताना आढळून आले.

लॉक डाऊन असताना विनाकारण गावात फेरफटका मारणाऱ्या युवकांना गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पायी मिरवत त्या युवकांना चांगलीच अद्दल घडवली आहे. यातून स्थानिक तसेच इतरही नागरिकांनी बोध घ्यावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

या कारवाही प्रसंगी पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, आप्पा काकड, मेघराज जाधव यांनी मोकाट फिरणाऱ्या वाहन धारकांना समज देऊन सोडून दिले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com