नांदगाव तालुक्यातील पिपरखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
स्थानिक बातम्या

नांदगाव तालुक्यातील पिपरखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Gokul Pawar

नांदगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरात घुसून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील पिपरखेेड येथे घडली आहे.

मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींला अटक करण्यात आली असुन पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडितेच्या आईने याबाबत नांदगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आठ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधून घरात घुसून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे तोंड दाबून धमकावत अत्याचार करण्यात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी भेट दिली.

नांदगाव पोलिसांत लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलमे अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींला न्यायालयात हजर केले असता ३ जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक संतोष मटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एम.आहिरे अधिक तपास करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com