हरसूल : खरशेत येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या
स्थानिक बातम्या

हरसूल : खरशेत येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

Gokul Pawar

वेळूंजे वि.प्र. : हरसूल पासून १४ कि.मी.अंतरावरील महाराष्ट्र व गुजरात सरहद्द लगत असलेल्या खरशेत येथील ज्ञानेश्वर शिवराम गांगोडे (१९) या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सदर माहिती पोलिस पाटील यांनी हरसूल पोलिस ठाणे येथे कळविल्याने हरसूल पोलिस ठाण्याचे सा.पो. नि. मा.विशाल टकले हे तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला.

उत्तरीय तपासणीसाठी हरसूल येथील उप जिल्हा रुग्णालय इथे पाठवण्यात आले असून अद्याप आत्महत्येचे कारण न समजल्याने पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com