निफाड : चांदोरी येथे गोदावरी नदीपात्रात बुडून महिलेचा मृत्यू
स्थानिक बातम्या

निफाड : चांदोरी येथे गोदावरी नदीपात्रात बुडून महिलेचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

निफाड : चांदोरी येथे गोदावरी नदीपात्रात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्योती साहेबराव जगधने (42) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवार (दि. १८) रोजी सायखेडा पुलापासून दोनशे फूट अंतरावर महिलेची पर्स आणि चप्पल आढळून आली. यानंतर ही माहिती पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनाचे सागर गडाख व टीमला पाचारण करून शोधमोहीम सुरु करण्यात आली. तब्बल ३२ तासांनी म्हणजेच सोमवारी (दि.२०) रोजी नदीपात्रात महिलेचे प्रेत आढळून आले. मयत महिलेच्या पर्समधून तिच्या चुलत्याचा मोबाईल न मिळाला त्यावरून फोन करून त्यांना बोलावले असता तिची ओळख पटली.

सदर महिला ही संगमनेर येथील असून तिचे माहेर करंजगाव (ता. निफाड) येथील आहे. सदर महिलेने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिच्या पर्समध्ये काही कागदपत्रे सापडली असून तपासाअंती या घटनेबद्दल अधिक माहिती पुढे येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com