नांदगाव : जातेगांव येथील मजूराचा विहिरीत पडून मृत्यू
स्थानिक बातम्या

नांदगाव : जातेगांव येथील मजूराचा विहिरीत पडून मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव : काम करत असतांंना विहिरीत तोल जाऊन पडलेल्या मजूराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जातेगांव येथे घडली. लक्षण कचरू पवार असे मृतांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ढेकू येथील शिंदे वस्तीवर विहिरीजवळ काम सुरू असतानाच लक्षण कचरू पवार रा.जातेगांव (३८) यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी मृत घोषित केले.

मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. जातेगांव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com