Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेवळा : खामखेडा येथील शेतकऱ्याने एक एकर कोबीवर फिरवला रोटर

देवळा : खामखेडा येथील शेतकऱ्याने एक एकर कोबीवर फिरवला रोटर

खामखेडा : सध्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी एक एकर कोबीवर रोटर फिरवला आहे.

खामखेडा परिसरात दरवर्षी उन्हाळी कोबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी पावसाळा चांगल्या प्रमाणात झाल्याने विहिरीनाही भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कोबी पिकाची लागवड केली होती. ५० हजार रुपये खर्चून कोबीवर मेहनत घेतली होती.

- Advertisement -

खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड करणे, मशागत, रासायनिक खत,औषधे फवारणी यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केला होता.

मात्र, लॉकडाऊन मुळे बाजारपेठा बंद आहेत व्यापारीही उपलब्ध नसल्याने विक्रीसही अडचणी असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मात्र सध्या भाजीपाला बाहेर विक्रीसाठी घेऊन जाणेही अवघड आहे. यामुळे कोबीचे पीक शेतातच सडू लागल्याने हतबल होत कोबीवर रोटर फिरवत उद्धवस्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या