दिंडोरी : कोरोनाशी लढा देत गटशिक्षणाधिकारी कनोज यांनी जोपासला चित्रकलेचा छंद
स्थानिक बातम्या

दिंडोरी : कोरोनाशी लढा देत गटशिक्षणाधिकारी कनोज यांनी जोपासला चित्रकलेचा छंद

Gokul Pawar

जानोरी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी आपल्याला संपुर्णपणे सुरक्षित रहायचे असल्यास आपण घरातच थांबले पाहिजे हे ओळखले आहे. पण घरातच करमणार कसं मग आपल्यातल्या कलाकारांना जागवून त्यात रमण्याचा प्रयत्न आज केला जात असून असाच एका चित्रकाराच्या रूपात बाहेर कला पडली आहे ती दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांची.

सध्या करोनाने जगभरात थैमान माजवले आहे. सध्या भारतभर लॉकडाऊन चालू असून सर्व कार्यालय ठप्प झाले आहे. आपण जर घरात असलो तरच आपण सुरक्षित होऊ याची गरज प्रत्येकाने ओळखली आहे. प्रत्येक जण आपापल्या सुरक्षेविषयी काळजी घेत आहेत. घरात थांबायचं परंतु वेळ जाईल तसा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आज निर्माण झाला आहे. यावरचा उपाय म्हणून बहुतेकांनी आपल्यातल्या कलाकाराला पुन्हा बाहेर काढून आपल्या आपल्या कलाकारी मध्ये वेळ घालवण्याचे प्रयत्न आज होत आहे.

याचंच उदाहरण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज हे होय. शिक्षण विभागाच्या सर्व विभाग प्रमुखांना कोरोनाची ड्युटी आहे. कोरंटाईन साठी तालुक्यातील ५ शाळांची वसतीगृहे तयार ठेवली आहेत. त्याची जबाबदारी असल्याने त्यांना बाहेर पडावे लागते.

वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने, बहुतांश वेळ मोबाईल मध्ये जातो. त्यातूनच थोडासा विरंगुळा म्हणून चित्र काढण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी आपल्यातल्या जुन्या चित्रकाराला पुन्हा चालना दिली असून त्यांनी चित्र काढण्यास सुरुवात केली आहे. याच चित्र काढताना निसर्गाबरोबरच त्यांनी आपल्या मुलीचा ही एक हुबेहूब फोटो काढला असून या फोटोचे सर्वत्र कौतुक होत असून गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्यातला चित्रकार सर्वांना दिसला आहे.

शालेय जीवनापासुन चित्रकला व हस्ताक्षर सुधारले. शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्याने, शालेय भिंतींवर चित्र काढणे- लिहिणे. यामूळे कलेला वाव मिळाला. आत्ता प्रशासकीय कामामुळे वेळ मिळत नाही. लॉक डाऊनमध्ये सहजच रंग व ब्रश शोधले आणि छोटासा प्रयत्न केला. कोरोनाचे संकट आज देशासमोर उभे असून सर्वांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे यातच आपले हित आहे.
– भास्कर कनोज, गटशिक्षणाधिकारी दिंडोरी.

Deshdoot
www.deshdoot.com