सिन्नर : विनापरवानगी स्वीट मार्ट सुरू ठेवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

सिन्नर : विनापरवानगी स्वीट मार्ट सुरू ठेवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

Gokul Pawar

वावी : जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचा भंग करत विनापरवानगी स्वीट मार्ट सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकाच्या विरोधात ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूलसिंग राजपुरोहीत (३५) यांचे शिर्डी महामार्गालगत बसस्थानकाशेजारी राजपुरोहित स्वीट मार्ट या नावाने मिठाईचे दुकान आहे.

करोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ किराणा व्यवसायिक, वैद्यकीय व्यावसायिक व शेती क्षेत्राशी संबंधित व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. असे असताना राजपुरोहित यांनी त्यांचे दुकान सुरू ठेवले होते.

यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी स्वतः शहानिशा करून पुरोहित यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या दोन महिन्यात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर गावातील व्यवसायिका विरुद्ध हा पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com