सटाणा : विरगाव जवळील मोटर सायकल अपघातात तिघेजण गंभीर

सटाणा : विरगाव जवळील मोटर सायकल अपघातात तिघेजण गंभीर

सटाणा : तालुक्यातील विरगाव जवळ तवेरा आणि मोटर सायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

समाधान महारु गायकवाड(२५) राहणार विंचुरे, कल्पना बाजीराव पवार (३०) राहणार सडक सौंदाणे व नूतन कापडणीस(२३) राहणार द्याने अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

तर आव्हाटी येथील नितीन सोनवणे(सटाणकर) असे तवेरा चालकाचे नाव आहे. दरम्यान दोन्ही जखमी महिलांना नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून मोटरसायकल चालकावर सटाणा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की विंचूर येथील समाधान गायकवाड हे आपली बहीण कल्पना पवार व नातेवाईक नूतन कापडणीस यांचे सोबत मोटरसायकलने विंचुरे येथे जात होते. त्याच वेळी आव्हाटी येथील नितीन सोनवणे यांच्या भरधाव वेगाने येणाऱ्या तवेराने मोटर सायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात मोटरसायकलचा चेंदामेंदा होऊन मोटरसायकल वरील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर तवेरा चालक नितीन सोनवणे ला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाल्याचे समजते. यासंदर्भात अद्याप सटाणा पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नाही .

Related Stories

No stories found.