त्र्यंबकेश्वरमध्ये दोन महिन्यात ९० जण क्वारंटाईन

त्र्यंबकेश्वरमध्ये दोन महिन्यात ९० जण क्वारंटाईन

त्र्यंबकेश्वर : शहरात मागील दोन महिन्यात ९० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून ग्रामीण भागातही पाय पसरत आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदने आता पर्यंत ९० जणांना क्वारंटाईन केलेले आहे. गत दोन महिन्यातली ही आकडेवारी आहे.

करोना या महामारीने संपूर्ण जग ठप्प झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत योग्य खबरदारी घेतली असल्याने तालूका व शहर करोना मुक्त आहे. परंतु जेव्हापासून लाँकडाऊन च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे.

लाँकडाऊन मध्ये बाहेर गावी अडकलेले, परगावी व पर प्रातांत गेलेले व परत शहरात आलेले टूरिस्ट यांचा यामध्ये समावेश आहे. त्रिंबक नगर परिषदने अमृतकुंभ येथे क्वारंटाईन कक्ष स्थापन केलेला आहे. याठिकाणी ८ जणांना क्वारंटाईन केलेले आहे तर होम क्वारंटाईन ८२ जणांना करण्यात आलेले आहे.

मार्च महिन्यात कोलकात्याला दर्शनासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २३ जणांचा समावेश असून यामध्ये त्र्यंबकेश्वर शहरातील ४ व ठाणापाडा व हरसुल येथील १९ नागरिक हे सर्व नाशिकला दाखल झाल्याचे समजते.

सुदैवाने नागरिक प्रशासन आरोग्य व विभाग यांच्या दक्षतेमुळे त्र्यंबकेश्वर शहर तसेच तालुक्यात करोनाचा शिरकाव नाही. तर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत ११४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com