नऊ वर्षीय अंजनाकडून चौथ्यांदा कळसूबाई सर
स्थानिक बातम्या

नऊ वर्षीय अंजनाकडून चौथ्यांदा कळसूबाई सर

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक । गरुडझेप प्रतिष्ठान, शिव सह्याद्री सामाजिक संस्था व ओम बजरंग संंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर फत्ते करण्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत अस्थिव्यंग असलेली अंजना प्रधान व 9 वर्षाची चिमुरडी मेघना पानमंद यांनीही सहभाग नोंदवून हे शिखर सर केले.

गरुडझेप प्रतिष्ठानची अस्थि दिव्यांग कार्यकर्ती अंजना प्रधान हिने 11 वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या मोहिमेत तिने सहभाग घेत चौथ्यांदा कळसूबाई शिखर सर केले.

तसेच मेघना पानमंद हिनेसुद्धा अतिशय अवघड अशी ही चढाई करून सोबत असलेल्यांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. गरुडझेपचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी देशभक्तीपर गीत गाऊन व सर्वांना प्रेरणा देत या मोहीमेस प्रारंभ केला.

शिव सह्याद्री सस्ंथेचे अध्यक्ष व दिव्यांंग असलेल सचिन पानमंद, सीमा पानमंद, आदिनाथ शेळके, विशाल होनमाने, मेघना पानमंद तसेच ओम बाजरंगचे बाळासाहेब मथुरे, मनोज पुरकर, कल्पना मथुरे व नंदलाल रणधीर यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

सिने छायाचित्रकार संदीप पवार व डॉ. भावसार यांनी या मोहिमेचे चित्रीकरण केले. बारी गावातील किरण खाडे तसेच बाघा खाडे यांंनी मोलाचे सहकार्य केले. पुढील मोहीम क्रमांक-5 दि.9 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे डॉ. भानोसे यांंनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com