पंचवटी : ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देण्याचे आमिष दाखवून ७८ हजारांची फसवणूक
स्थानिक बातम्या

पंचवटी : ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देण्याचे आमिष दाखवून ७८ हजारांची फसवणूक

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचवटी : ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन बसवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे दहा व्यक्तींना ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पंचवटी परिसरात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संदीप बबनराव गोसावी यांच्या तक्रारीवरून संशयित अनिकेत प्रवीण निकाळे( रा.प्लॅट नं.१० श्रीजी अपार्टमेंट, महालक्ष्मीनगर, हिरावाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार संदीप गोसावी हे एका खाजगी कंपनीत नोकरीस असून लॉकडाऊन काळात कंपनीने प्रत्येक कर्मचाऱयांनी घरी ब्रॉडबँड कनेक्शन घेऊन काम करण्यास सांगितले होते.

या काळात गोसावी यांनी मार्च महिन्यात कृष्णा इंटरप्रायजेस ब्रॉडबँड नेटवर्क कम्युनिकेशन या ब्रॉडबँड सेवा देणारे अनिकेत निकाळे यांच्याशी संपर्क साधून घरी ब्रॉडबँड कनेक्शन बसविण्यासाठी विचारणा केली असता लॉकडाऊन मुळे मटेरियलचा प्रॉब्लेम सुरू असल्याने ऍडव्हान्स पैसे द्या त्यानंतर त्वरित कनेक्शन देण्याचे सांगितले.

तेव्हा संदीप गोसावी यांनी संशयित निकाळे याच्या गुगल पे अकाऊंट मध्ये १० हजार रुपये ऑनलाइन पाठविले. यानंतर गोसावी यांनी वारंवार कनेक्शन बाबत विचारणा केली असता साहित्य आले नसल्याचे कारण दिले. साधारण आठ दिवसानंतर गोसावी यांनी कामाची निकड लक्षात घेऊन दुसऱ्या कंपनीकडून कनेक्शन घेतल्या नंतर निकाळे यास फोन करून दिलेल्या पैशाची मागणी केली असता दिले नाही.

अशाच प्रकारे संदीप गोसावी यांचे बरोबर कंपनीत काम करणारे सहकारी हितेश जैन, राकेश महाजन, दीप्ती घोडेराव, सोनल ताडगे, मिनाक्षी शेलार, अमित अकोलकर, कैलास घुगे, अमोल पाटील, सुमेधा जोशी आदींची सुमारे ७८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com