सिन्नर : जामगाव येथील ७० वर्षीय वृध्दा करोना पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

सिन्नर : जामगाव येथील ७० वर्षीय वृध्दा करोना पॉझिटिव्ह

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर : तालुक्यातील जामगाव येथील ७० वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

पायाचे हाड फॅक्चर झाल्याने शस्त्रक्रियेसाठी सदर महिलेस नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सदर महिलेची करोना तपासणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी जामगाव येथे जाऊन महिला राहत असलेल्या ठिकाणी पाहणी केली.

या महिलेच्या संपर्कातील बारा हाय रिस्क व्यक्तींना सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आले. तर अठरा रिस्क संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जामगाम- चंद्रपूर रस्ता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com