Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात काही तासात ६० नव्या रुग्णांची नोंद; कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला १०७८

राज्यात काही तासात ६० नव्या रुग्णांची नोंद; कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला १०७८

नाशिक : कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज सकाळी ११ वाजेपर्यंत ६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७८ वर पोहचली आहे.

दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७८ वर पोहोचली आहे. यात कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या ६० नव्या रुग्णांचाही समावेश आहे.

- Advertisement -

एकट्या मुंबई महापालिका अंतर्गत ४४ नव्या रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. याशिवाय पुणे ९, नागपूर ४, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

कालपर्यंत राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या १०१८ इतकी होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच ६० नव्या रुग्णांची नोंद होऊन महाराष्ट्र तब्बल १०७८ वर पोहोचला आहे.

तर दिवसेंदिवस वाढत असलेल्या या कोरोना व्हायरसचा अटकाव करणयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार व आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या