इगतपुरी : ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण; संपर्कातील २१ जण क्वारंटाईन
स्थानिक बातम्या

इगतपुरी : ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण; संपर्कातील २१ जण क्वारंटाईन

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : ग्रीन झोन असलेल्या इगतपुरी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असुन शहरातील नवा बाजार येथील ५६ वर्षीय रहिवासी करोना बाधित आढळला आहे. सदर इसम हा नाशिक येथे खाजगी रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे उपचार घेत होता. तेथे त्याची शारीरिक तपासणी केली असता सदर रुग्ण करोना बाधित आढळला.

खबरदारी म्हणून स्थानिक स्थानिक प्रशासनाने रुग्ण आढळलेला नवा बाजार परिसर पन्नास मीटर पर्यंत चौदा दिवसांपर्यंत सील करण्यात आला आहे. तसेच रुग्णाच्या कुदुंबातील चार जणांना भावली येथील शासकीय एकलव्य निवासी आश्रम शाळेत कोरोंटाईन केले तर रूग्णाच्या संपर्कातील एकवीस लोकांना घरातच होम कोरोंटाईन केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एम. बी. देशमुख यांनी दिली.

या परिसरातील व शहरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी मास्क अथवा रुमाल तोंडाला लावावे व सोशल डिस्ट्सनिंगचे पालन करुन सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे व मुख्याधिकारी निर्माला गायकवाड-पेखळे यांनी नागरीकांना केले आहे.

तहसिलदार व शासकीय अधिकारी यांनी सदर परिसर सिल केला असुन होम कोरोंटाईन केलेले नागरीक सर्रास बाजार पेठेत खरेदी करतांना व शहरात फिरतांना टोळक्याने गप्पा मारत आजुबाजुच्या परिसरात दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com