Friday, April 26, 2024
Homeनाशिकपंचवटी येथील ३६ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू; अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची माहिती

पंचवटी येथील ३६ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू; अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची माहिती

नाशिक : शहरातील पेठरोड पंचवटी येथील ३६ वर्षीय करोना संसर्गित पुरुष रूग्णाचे आज (दि.२५) रोजी जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे निधन झाले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

या संदर्भात माहिती देताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे की, पेठरोड पंचवटी, नाशिक येथील ३६ वर्षीय पुरुष २२ मे २०२० रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल झाले. त्यापूर्वी काही दिवस त्यांना ताप, घशात दुखणे व श्‍वसनाचा त्रास होत असल्याने ते २१ मे २०२० रोजी झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी गेले.

- Advertisement -

त्यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता व रक्तातील साखरेचे प्रमाण ६०० पेक्षा जास्त असल्याचे तपासात आढळून आले, तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (spo2) कमी होत असल्याचे दिसून आले. म्हणून त्यांचे घशाचे नमुना तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे संदर्भीत करण्यात आले.

जिल्हा रूग्णालयात त्यांच्या छातीच्या एक्स-रे मध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना मार्फत योग्य ते उपचार सुरू होते.
दि.२२ मे २०२० रोजी सायंकाळी त्यांच्या घशाचा नमुना अहवाल कोरोना बाधित असा आला. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने पूर्णवेळ ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात येत नव्हते.

(दि.२४) रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या टीमने पूर्ण प्रयत्न करूनही आज (दि.२५) रोजी सकाळी त्यांचे निधन झाले, असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या