त्र्यंबकेश्वर : तोरंगण येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

त्र्यंबकेश्वर : तोरंगण येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

वेळुंजे | देवचंद महाले : त्रंबकेश्वर तालुक्यातील अंडे तोरंगण येथे एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनीता विलास वळवी (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटूंबिक कारणावरून झालेल्या वादातून हि घटना घडली. सदर घटनेची माहीती पोलीस पाटील जाधव यांनी कळवली.

शुक्रवारी (दि.०३) रोजी दोघा पती पत्नी मध्ये वाद झाला होता. त्या वेळीही या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांच्या समयसुचकतेमुळे या महिलेला वेळीच वाचविता आले.

परंतु आज सकाळी सहा वाजता या महिलेने पुन्हा गळफास घेतला. यावेळीही ग्रामस्थांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

घटनेनंतर या महिलेस तात्काळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नेले असता तिथून त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालय नाशिक या ठिकाणी हलवण्यात आले .त्या ठिकाणी डॉक्टरांनी या महिलेस मृत घोषित केले.

पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे स.पो.निरीक्षक मा.रामचंद्र कर्पे हावलदार आहेर व पो. हावलदर लोखंडे करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com