Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसुरगाणा : तळपाडा येथील करोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील ३१ जण क्वारंटाइन

सुरगाणा : तळपाडा येथील करोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील ३१ जण क्वारंटाइन

सुरगाणा : तालुक्यातील तळपाडा (हातरूंडी) येथील मात्र नाशिक येथे वास्तव्यास असलेले समुदाय आरोग्य अधिकारी करोना संक्रमित असल्याचे समोर आल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करोना संक्रमित सदर सीएचओ नऊ एप्रिल रोजी मुळगावी तळपाडा (हातरूंडी) येथे आले होते. दुसऱ्या दिवशी दहा एप्रिल रोजी ते पुन्हा नाशिकला रवाना झाले होते. मात्र यादरम्यान कुटूंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकतीस जणांना होम कॉरंटाईन मध्ये ठेवले आहे. यामध्ये माता पित्यासह दोन महिन्याचे बालक तसेच एक डॉक्टर त्यांचे कुटुंब व चालक यांचा समावेश आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत या सर्वांमध्ये करोनाच्या बाबतीत कोणतेही लक्षणं नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्ती आणखी कुणाच्या संपर्कात आल्या आहेत काय? याबाबत गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी विशेष लक्ष दिले आहे.

तहसिलदार विजय सुर्यवंशी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणवीर, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे आदी दिवस रात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

करोनाबाधित रुग्ण हा तालुक्यातील रहिवासी असला तरी तो नाशिकमध्येच रहात आहे. तळपाडा(ह) येथे वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून एकतीस जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावातील कोणालाही ताप, सर्दी, खोकला, दम लागणे अशा प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये. शासना कडून आलेल्या सुचनांचे पालन करावे. माॅस्क लावणे, हात धुणे, सॅनेटाईजचा वापर करावा. वैद्यकीय पथक सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
-डाॅ. दिलीप रणवीर, तालुका वैद्यकीय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या