लासलगाव : २८ वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू

लासलगाव : २८ वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू

लासलगाव : येथील आव्हाड हाॅस्पीटल समोर एका २८ वर्षीय युवकाचा शाॅक जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विकी भाऊसाहेब बोरनारे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , लासलगाव येथील आव्हाड हाॅस्पीटल समोर जलशुध्दीकरण केलेले पाणी विक्रीचा व्यवसाय करणारे विकी भाऊसाहेब बोरनारे यांना विजेच्या तारांचा शाॅक लागुन जखमी झाला. त्यास तात्काळ लासलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजाराम शेंद्रे यांनी मृत घोषीत केले.

वैद्यकीय अहवालानुसार लासलगाव पोलिस कार्यालयात घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असुन अधिक तपास लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com