टाकेद : दारणा नदीपात्रात बुडून २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

टाकेद : दारणा नदीपात्रात बुडून २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

इगतपुरी : तालुक्यातील घोटी खुर्द of येथील दारणा धरणाच्या पात्रात २८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ. विनोद नामदेव मेमाने (वय २८) असे या मृत युवकाचे नाव आहे.

दरम्यान बांबळे वाडी येथील रहिवासीमृत विनोद मित्रासमवेत मावशीकडे घोटी येथे आले होते. यावेळी मृत विनोद दारणा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्रांनी आरडाओरड करून इतरांना माहिती सांगितली असता रात्रभर शोध घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नाही.

आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान डॉक्टर मेमाने यांचा मृतदेह मिळून आला. या घटनेची पहिली खबर घोटी खुर्दचे पोलीस पाटील कैलास कोकणे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यात दिली.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील, पो. हवा. वाजे बोराडे, गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथे पाठविण्यात आला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com