Friday, April 26, 2024
Homeनाशिकमागील तीन दिवसांत परदेशातून आलेले २८ जण क्वारंटाईन

मागील तीन दिवसांत परदेशातून आलेले २८ जण क्वारंटाईन

नाशिक : लाॅकडाऊनमुळे जगभरात भारतीय नागरिक अडकले असून त्यांना परत मायदेशात आणण्यासाठी सरकारने वंदे भारत ही मोहीम हाती घेतली आहे.

मागील तीन दिवसात २८ नाशिककरांना भारतात आणण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणीकरुन त्यांना शहरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

वंदे भारत मोहीमेच्या पहिल्या पाच दिवसात एअर इंडियाने सहा लाखांहून अधिक भारतीयांना मायदेशी आणले आहे. लाॅकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ३१ देशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी १४५ विमाने पाठविण्यात येणार आहे.

नाशिकमधील व्यक्ति देखील मोठया संख्येने परदेशात अडकले आहेत. मागील तीन दिवसात २८ नाशिककरांना भारतात आणण्यात आले. त्यामध्ये लंडन, शिकागो, सिंगापूर, मनिला, सन फ्रान्सिस्को व न्यूयाॅर्क या शहरातील अडकलेल्यांचा समावेश आहे.

मुंबई विमानतळावरावर आगमन झाल्यावर त्यांची थर्मल स्कॅनिंग करुन करोना चाचणी करण्यात आली. करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुढील १४ दिवस ते क्वारंटाईन राहणार असून त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या