सिन्नर : वावी येथे २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला

सिन्नर : वावी येथे २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला

वावी : तालुक्यातील मर्हळ बुद्रुक येथे बेपत्ता असलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माया मच्छिंद्र कुरहे (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

दरम्यान माया ही गुरुवारी (दि.०२) दुपारी दोन वाजेपासून घरात कोणाला न सांगता निघून गेल्याची खबर पती मच्छिंद्र कुरहे यांनी दिली होती. आज (दि.०३) सदर विवाहितेचा मृतदेह घराजवळील विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. व्ही. शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com