नव्या २३२ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २९१६ वर

नव्या २३२ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २९१६ वर

मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे, त्यात महाराष्ट्र हा आघाडीवर आहे. एकीकडे राज्याचा मृत्युदर हा जगात सर्वात जास्त असल्याची बातमी येत असताना, आज महाराष्ट्रात २३२ नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, राज्यात एकूण रुग्ण संख्या २९१६ झाली आहे.

दरम्यान कोरोना व्हायरस संख्या दिवसेंदिवस वाढत असून ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आतापर्यंत २९५ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८७ मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचारपद्धती, गंभीरावस्थेतील रुग्णांना वाचविणे यासह इतर वैद्यकीय मुद्द्यांवर राज्यसरकार काम करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com