Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील २२ कोरोना स्वँब धुळे प्रयोगशाळेत; अहवालाचा विलंब टळणार

जिल्ह्यातील २२ कोरोना स्वँब धुळे प्रयोगशाळेत; अहवालाचा विलंब टळणार

नाशिक । केंद्र शासनाच्या मान्यतेने नाशिक विभागासाठी कोरोना चाचण्यांसाठीची प्रयोगशाळा धुळे येथे सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी नाशिक जिह्यात नव्याने दाखल तसेच प्रलंबित असलेले २२ संशयीत रूग्णांचे स्वॅबचे नमुने या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. यामुळे आता कोरोना चाचणी अहवालांचा विलंब टळनार असून याचा रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रूग्णालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळा येथे या विभागाची निर्मीती करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापण करण्यासाठी देशभरात अशा प्रयोग शाळांचे जाळे उभारण्यात येत आहे.

- Advertisement -

या अंतर्गत शासनाने या प्रयोगशाळेसाठी निधीसह २०० चीैरस मिटर जागेची व्यवस्था करून दिली आहे. या प्रयोगशाळेतील कामकाजास प्रारंभ झाला असून नाशिक जिल्ह्यातील पुणे प्रयोग शाळेकडे प्रलंबित असलेले आणि नवीन दाखल झालेल्या २२ रूग्णांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचे अहवाल काही तासात उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी संपूर्ण राज्याचे कामकाज पुणे येथील प्रयोग शाळेकडे सुरू होते. मात्र कोरोनाच्या संसर्ग वाढल्याने या प्रयोगशाळेवर ताण वाढला होता.

उत्तरमहाराष्ट्राच्या सोयीसाठी धुळे येथे प्रयोग शाळेची निर्मीती करण्यात आली आहे. पुणे येथे जाण्या येण्यासाठी बराच अवधी जात असल्याने त्याचा परिणाम अहवाल प्राप्तीवर होत होता. अहवाल प्राप्तीसाठी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र धुळे येथील प्रयोग शाळा निर्मीतीमुळे उत्तरमहाराष्ट्रातील जिह्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना रुग्णांना लाभ

करोनाचा संसर्ग सगळीकडे वाढत असताना. रुग्णांचा चाचणी अहवाल लवकर मिळल्यास तसे उपचार व दक्षता घेता येते. धुळे वाहतूकीच्या दृष्टीने अवघ्या तासाभरात स्वॅबचे नमुणे पोहचविणे शक्य असल्याने कोरोना आणि स्वाईन फ्ल्यू सारख्या आजाराचे निदान २४ तासाच्या आत करणे शक्य होणार आहे. याचा रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
– डाँ. सुरेश जगदाळे, जिल्ह शल्य चिकित्सक

- Advertisment -

ताज्या बातम्या