Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा दिवसात २१ लाखाचा मद्यसाठा जप्त; सव्वादोनशे गुन्हे...

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा दिवसात २१ लाखाचा मद्यसाठा जप्त; सव्वादोनशे गुन्हे दाखल

नाशिक : लाँकडाऊन काळात मद्याची दुकाने बंद असल्याने जिल्हाभरात चोरी छुपी गावठी मद्याचे अड्डे सुरू झाले अाहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धाडी टाकत तब्बल २१ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. तर २१५ हून अधिक गुन्हे दाखल करुन ८ जणांना अटक केले आहे.

करोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी मद्याची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे तळीरामांचे हाल हाेत असल्याने अनेकांनी विविध मार्ग शोधले आहेत. यामुळे जिल्हाभरात अवैध मद्याचा सुळसुळाट झाला आहे.

- Advertisement -

संचारबंदी जाहिर होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने या काळात मद्यवाहतूकीबरोबरच मद्यनिर्मीती आणि अवैध विक्री रोखण्यासाठी जिल्हाभरात छापासत्र राबविले आहे.

जिह्यास लागून असलेला सिमा भाग एक्साईज विभागाने ताब्यात घेतल्याने नजीकच्या केंद्र शासित प्रदेशातून होणारी अवैध दारू रोखण्यात यश आले आहे. लॉकडाऊन काळात बेकायदा मद्यविक्री करतांना आढळून आल्यास थेट परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केल्याने जिह्यातील दारूचे अर्थकारण बदलले आहे.

ग्रामिण भागातील गावठी मद्याने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान कारवाई करीत २१५ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत भरारी पथकांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या असल्या तरी २०० हून अधिक संशयीत पसार झाले आहेत.

जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात उत्पादन शुल्क विभागाच्या हाती एका वाहनासह तब्बल २१ लाखाहून अधिक किंमतीचा मद्यसाठा व इतर मुद्देमाल आला आहे. त्यात ८०० लिटर गावठी दारू आणि ७६ हजार १६१ लिटर रसायणाचा समावेश आहे. याबरोबरच देशी – विदेशीसह बिअर,ताडी आणि वाईनचाही तुरळक प्रमाणात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या