इंदिरानगर परिसरात १८ वर्षीय युवतीची आत्महत्या
स्थानिक बातम्या

इंदिरानगर परिसरात १८ वर्षीय युवतीची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : राहत्या घरी १८ वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगरच्या मुरलिधर नगर भागात घडली.

मृणाली प्रविण सरदार (१८ रा सप्तशृंगी सहारा अपा. गामणे मळा) असे आत्महत्या करणार्‍या तरूणीचे नाव आहे. मृणाली सरदार हीने मंगळवारी (दि.७) आपल्या राहत्या घरातील खिडकीच्या गजास गळफास लावून घेतला होता.

ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com