Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात नव्याने १५ कोरोना संशयित दाखल; संशयितांची संख्या ३७ वर

जिल्ह्यात नव्याने १५ कोरोना संशयित दाखल; संशयितांची संख्या ३७ वर

नाशिक : जिल्हयात नव्याने १५ कोरोना संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, मालेगाव रुग्णालय आणि महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (दि.२) रात्री दाखल झालेल्या सहा रुग्णांसह ३७ रुग्णांचे रिपोर्ट धुळे प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल रात्री उशिरा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ७, तर मालेगाव सामान्य रुग्णालयात ५ , नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात ३, असे १५ नवीन कोरोना संशयित रुग्ण शुक्रवारी (दि.३) दाखल झाले आहेत. तर, धुळे शासकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेले ३७ कोरोना संशयितांची रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.

- Advertisement -

तिन्ही कक्षात सध्या पॉझिटिव्ह असलेल्या युवकांसह त्याची आई आणि दाखल रुग्ण असे ३९संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, गुरुवारी पाठविलेल्या ३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. अतर्यंत १६९ नमुन्यांपैकी ‍१३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाकडून खुलासा करण्यात आल्यानंतर संभ्रम दूर झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या